केएल राहुलची ऑरेंज कॅप धोक्यात! हा धडाकेबाज फलंदाज शर्यतीमध्ये

१३ व्या आयपीएल विजेता ठरविण्यासाठी आता फक्त दोन सामने शिल्लक आहेत. कोरोना संसर्गाच्या कचाट्यात खेळवल्या जाणार्‍या या स्पर्धेत चांगला खेळ पाहायला मिळाला. किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलने आतापर्यंत ऑरेंज कॅप कायम ठेवली आहे. मात्र, अंतिम सामना झाल्यानंतर ही टोपी दुसर्‍या फलंदाजाच्या डोक्यावर जाण्याची शक्यता आहे.

१३ व्या सत्रात केएल राहुलने शानदार कामगिरी करत १४ सामन्यांत ५५.८३ च्या सरासरीने ६७० धावा केल्या. केएल राहुलने या मोसमात एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली. हंगामाच्या सुरुवातीच्या सामन्यांपासून आतापर्यंत केएल राहुलने ऑरेंज कॅप कायम ठेवली आहे.

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरनेही गेल्या काही सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरीसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहे. डेव्हिड वॉर्नरने १५  सामन्यांत ४२ च्या सरासरीने ५४६ धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर आयपीएलमध्ये आणखी एक सामना खेळणार आहे. वॉर्नरच्या संघाने क्वालिफायर दोनमध्ये दिल्लीला पराभूत करुन अंतिम तिकिट सामन्याचे मिळवले तर वॉर्नर केएल राहुलच्या डोक्याची ऑरेंज कॅप आपल्या डोक्यावर मिरवू शकतो.


Post a Comment

0 Comments