विठ्ठलाच्या महापूजेचा मान वर्धा जिल्ह्यातील भुयार दाम्पत्य, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार



पंढरपूर/प्रतिनिधी:

कार्तिक एकादशी दिवशी रात्री दोन वाजता विठ्ठल रुक्मिणी मातेचे शासकीय पूजा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत मानाचा वारकरी म्हणून 
कवडुजी नारायण भोयर ( वय ६४) व कुसुमबाई कवडूजी भोयर (वय ५५ रा.मु.डौलापूर, पो. मोझरी शेकापूर, ता.हिंगणघाट, जि. वर्धा) या दाम्पत्यांची निवड करण्यात आल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली
(Advertise)

श्री.विठ्ठल- रूक्मिणी मंदिरात पहारा देणाया सहा विणेक-यांपैकी पांडूरंग चिट्टीने कवडुजी नारायण भोयर वय ६४ वर्षी (रा.मु.डौलापूर, पो. मोझरी शेकापूर, ता.हिंगणघाट, जि. वर्धा) यांची २२ नोव्हेंबर रोजी  निवड करण्यात आली आहे. कवडुजी नारायण भोयर व कुसुमबाई  कवडुजी भोयार हे मागील ९ ते १० वर्षापासून मंदिरात विणा वाजवून पहारा देत आहे. ते स्वतः व त्यांचे कुटुंबिय देखील माळकरी आहेत. मागील ८ महिन्यांपासून लाॅकडाऊन असताना देखील पूर्णवेळ ते मंदिरात सेवा करीत आहेत.
(Advertise)

कोण असतो मानाचा वारकरी...
आषाढी वारी किंवा कार्तिकी वारी मध्ये वारकऱ्यांमध्ये हा मानाचा वारकरी निवडला जातो ही निवड विठ्ठलाची महापूजा करताना जे दांपत्य रांगे मधून महापूजेच्या वेळेस पहिले येते त्यांना मान मानता वारकरी म्हणून आषाढी किंवा कार्तिकी वारी मध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सोबत शासकीय महापूजेचा मान दिला जात असतो. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, यावर्षी कार्तिकी यात्रा मर्यादित व प्रतिकात्मक स्वरूपात साजरी करण्यात येत आहे. श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. त्यामुळे श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरात २४ तास पहारा देणारे विणेकरी यांची उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणा-या शासकीय महापूजेसाठी मानाचा वारकरी म्हणून निवड करण्याचा मंदिर समितीने निर्णय घेतला होता.
(Advertise)

अशी असणार विठ्ठलाची शासकीय महापूजा

गुरुवार पहाटे एक वाजता श्री विठ्ठल - रुक्‍मिणीची नित्यपूजा मंदिर समितीच्या सदस्यांच्या हस्ते केली जाईल. त्यानंतर दोन वाजून वीस मिनिटे ते तीन या वेळात श्री विठ्ठलाची तर तीन ते साडेतीन या वेळात श्री रुक्‍मिणी मातेची महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्निक होईल. त्यानंतर पवार यांच्या हस्ते मानाच्या वारकऱ्याचा आणि मंदिर समितीच्या वतीने पवार यांचा सत्कार होईल. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासह मानाचे वारकरी दांपत्य यांसह विठ्ठल मंदिर कर्मचारी व सदस्य असे २५ जणांना मंदिरात उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे

Post a Comment

0 Comments