करमाळा माढा विधानसभा मतदारसंघात महावितरण संबंधित शेतकरी वर्गाच्या विविध अडचणी व समन्वय चर्चा सोलापूर येथे मा. अधीक्षक अभियंता पडळकर साहेबांच्या दालनात तालुक्यातील महावितरण चे सर्व अधिकारी व दहिगाव कोळगाव उपसा सिंचन चे सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीत ही समन्वय बैठक झाली, त्यावेळी आमदार संजय मामा शिंदे यांनी विविध सूचना केल्या.
अधिकारी वर्गाने शेतकरी केंद्रबिंदू ठेवून त्यांना सुलभ होईल असे नियोजन करावे, उजनी व कोळगाव लाभ क्षेत्रात डी पी साठी व नवीन कनेक्शन साठी शेतकऱ्यांना सहकार्य करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जि प सदस्य उद्धव दादा माळी, मा. सभापती चंद्रहास निमगिरे, आदिनाथ चे संचालक तानाजी बापू झोळ, युवा नेते पै माणिक (दादा) पाटील, प स सदस्य दत्ता जाधव, कुकडी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुजित तात्या बागल, कोर्टी चे निळकंठ अभंग, सुभाष अभंग, पै शहाजी कोंडलकर आदी उपस्थित होते.
या बैठकीत अधीक्षक अभियंता पडळकर साहेब यांनी आमदारांनी केलेल्या सूचना प्रमाणे कामकाज करून त्या संबंधित अहवाल माझ्याकडे सोपविण्यात यावा, असे करमाळा तालुक्यातील सर्व महावितरण अधिकाऱ्यांना सांगितले जेऊर उपविभाग अभियंता गलांडे यांनी आभार मानले.
0 Comments