"....मुख्यमंत्री अन् शरद पवारांवर साधला निशाणा"


“मुख्यमंत्री नसताना त्यांनी जी मागणी केली ती मुख्यमंत्री झाल्यावर पूर्ण केली असती तर शेतकरी समाधानी झाला असता”, असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राचा कोणताही प्रदेश अतिवृष्टीपासून वाचला नाही. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. जागतिक तापमान वाढ हे या मागचं कारण असल्याचं अभ्यासक सांगतात. मात्र, याला शेतकरी जबाबदार आहे का ? मग त्यानेच का भोगायचं? असा संतप्त सवाल यावेळी राजू शेट्टींनी केला.

राजू शेट्टी यांनी यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. “ऊस तोडणी कामगारांनी आंदोलनाची हाक दिल्यावर काही नेत्यांनी तातडीने पुढाकार घेऊन त्यांचा प्रश्न सोडविला. मग शेतकऱ्यांना भाव मिळावा म्हणून कोणी असा पुढाकार घेत नाही ?”

Post a Comment

0 Comments