घरी सोडतो सांगून १७ वर्षीय तरुणीवर लॉजवर नेऊन बलात्कार


पुण्यातील हडपसर भागात राहणार्‍या १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अभय बनसोडे असं आरोपीचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “पीडित तरुणी आणि आरोपी हे एका प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करतात.पीडित तरुणी आधीपासूनच तिथे कामास होती. कामानिमित्त आरोपीची पीडितेसोबत ओळख झाली.

 १३ तारखेला दुपारच्या सुमारास आरोपी तरुण घरी सोडतो सांगत पीडित तरुणीला सोबत घेऊन निघाला होता. मात्र आरोपी तरुणीला एका लॉजवर घेऊन गेला आणि बलात्कार केला. यानंतर तेथून पसार झाला”.

 उपलब्ध माहितीच्या आधारे तपास करत आरोपीला जेरबंद करण्यात करण्यात आलं. पीडित तरुणीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments