"सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी कलम १४४ लागू"- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर


सोलापूर/प्रतिनिधी: 

पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची विधानपरिषद निवडणूक मंगळवार, दि. १ डिसेंबर २०२० रोजी होत असून ही प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पार पडण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मतदान केंद्राच्या परिसरात सकाळी ६ वाजेपासून ते मतदान संपेपर्यंत कलम १४४ लागू केले आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.
(Advertise)

 हा आदेश जिल्ह्यातील अंतिम मतदान ठिकाण आणि केंद्र संख्येच्या मान्यतेनुसार मतदान केंद्राच्या ठिकाणापासून २०० मीटर अंतरासाठी लागू राहतील. या परिसरातील सर्व मंडपे, दुकाने, मोबाईल, कार्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन, चिन्हांचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त व्यक्तीला मतदान केंद्र परिसरात प्रवेश करण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे.
(Advertise)

आदेशाचे उल्लंघन केल्यास लोक प्रतिनिधीत्व अधिनियमामधील तरतुदीनुसार व भारतीय दंड विधान कलम १८८ प्रमाणे दंडनिय कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments