लोकवार्ता | राशिभविष्य सोमवार, २ नोव्हेंबर, २०२०



मेष :
आज एखाद्या छंदातूनही तुम्हाला चांगली कमाई होईल. दिवस आनंदात जाईल. पैशाची अडचण दूर होईल. जोडीदाराचे मन जिंकाल.

वृषभ : 
व्यवसायातील अनेक अडचणींवर मात करूनही तुमच्या यशाची कमान चढतीच राहील.प्रवासाचा योग आहे. खर्च कमी करून योग्य गुंतवणुकीस प्राधान्य द्याल. 

मिथुन :
आज तुमचा कामाचादिवस चांगला राहील. जे मनी योजाल ते तडीस न्याल. इतरांसही कामात मदत कराल.गृहिणी कौटुंबिक प्रश्न सामंजस्याने सोडवतील.

कर्क : 
नोकरदारांना वरिष्ठांकडून सन्मानाची वागणूक मिळेल. जुने मित्र भेटतील. तुमच्या कार्यनिष्ठेची दखल घेतली जाईल. व्यस्त दिवस राहल.

सिंह : 
मनसोक्त खर्च केलात तरी पैशाची कमतरता भासणार नाही. आज दैव तुमच्या बाजूने. प्रयत्नास यश मिळेल. जोडीदार खुश असेल.

कन्या : 
कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करू नका. आज वेट अँड वॉचचे धोरण ठेवा. कंटाळवाणा दिवस जाईल. जवळच्या माणसाकडून जास्त अपेक्षा धरु नका.

तूळ : 
जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. गृहिणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदीत होतील. कामात यश मिळेल. आनंदी रहाल.

वृश्चिक : 
भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य देऊनच काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. विद्यार्थ्यांस यश सोपे नाही. कौटुंबिक कलह वाढतील. कोणत्याही निर्णय घेताना शांत डोक्याने घ्या.

धनु : 
व्यवसायात उत्तम आर्थिक यश मिळेल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. आज गरजूंना मदत कराल. दिवस आनंदात जाईल.

मकर :
आज कौटुंबिक समस्यांवर लक्ष केंद्रित कराल. गृहिणींना आज गृहोद्योगांतून चांगली कमाई होईल. जोडीदाराला खुश ठेवाल. जुने खुप दिवसानंतर भेटतील.

कुंभ : 
काही आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल.श्वसनाचे विकार असतील तर विशेष काळजी घ्या. कामात व्यस्त रहाल. पैशाची अडचण दूर होईल.

मीन : 
तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. यशस्वी व्यक्तींच्या सहवासात तुमच्या महत्त्वाकांक्षा वाढतील. व्यवसायवृद्धी होईल. इतरांनाही कामात मदत कराल.

Post a Comment

0 Comments