मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी पैगंबर नदाफ व संदीप सावंत यांची बदली करण्यात आली असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे. याबाबत बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक झेंडे म्हणाले की, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या आदेशानुसार या दोन कर्मचाऱ्यांची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.
दरम्यान पोलीस कर्मचारी संदीप सावंत व पैगंबर नदाफ हे सतत वादग्रस्त राहिलेले कर्मचारी असून त्यांची बदली गोपनीय करण्यात आलेल्या तक्रारीवरून करण्यात आली आहे. दरम्यान मंगळवेढा पोलीस ठाण्यातील अजून काही कर्मचारी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या रडारवर असल्याचे दिसून येत असून जे अवैध काम करत आहेत त्यांच्यावर लवकरच कारवाई होणार असल्याचे दिसत आहे.
सध्या मंगळवेढा तालुक्यात अवैध वाळू, जुगार,गुटखा,बास्टिंग ट्रॅक्टर आदी अवैध धंदे सुरू असून याबाबत यांचा काही संबंध आहे का? अजून कोण कर्मचारी यामध्ये सामील आहेत का ? याची चौकशी करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
0 Comments