करमाळा/प्रतिनिधी:
शिवसेना नेते विश्वनाथ नेरुरकर यांचा दि. ०९/११/२०२० रोजी असलेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा सेनेच्या वतीने करमाळा तालुक्यातील तरटगाव येथे रक्तदान शिबीर आयोजित केले होते. सदर शिबिराचे उदघाटन जेष्ठ शिवसैनिक अरविंद विनायक घाडगे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आवाहना नुसार सदरचे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरामध्ये १०३ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जोपासली. त्याबद्दल युवा सेनेच्या वतीने त्यांचे आभार मानून त्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आली.
यावेळी तरटगावचे सरपंच डॉ. अमोल घाडगे,शिवसेना जिल्हा उपप्रमुख भरत अवताडे, युवा सेना शहरप्रमुख विशाल गायकवाड आदींसह शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते.
0 Comments