"संजय राऊतांवर निलेश राणे यांनी खरमरीत टिका"


संजय राऊतांचा गजनी झालाय ते पराभव विसरतात, शिवसेनेचा पराभव जसा बाहेर होतो, तसा महाराष्ट्रात होण्यास वेळ लागणार नाही, याची मला खात्री आहे, असा टोला भाजप नेते निलेश राणेंनी शिवसेना खासदार संजय राऊतांना लगावलाय.

बिहार निवडणुकीच्या निकालावरून निलेश राणेंनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत निलेश राणे बोलत होते.
शिवसेनेची लायकी काय होती हे आम्हाला माहिती होतं. संजय राऊत विसरले होते, गोव्यामध्ये ही तसेच झालं होतं. गोव्यामध्ये सर्व मिळून ९०० मते शिवसेनेला मिळाली होती, अशी टीका निलेश राणेंनी केलीये.

दरम्यान, बिहार निवडणुकीत शिवसेनेला अनेक ठिकाणी नोटापेक्षा कमी मते मिळाल्यानं निलेश राणेंनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय.

Post a Comment

0 Comments