करमाळा/प्रतिनिधी:
करमाळा तालुक्यात अवैध धंदे जोमात चालू असून पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले असून यासाठी आमरण उपोषण करणेबाबत.
सध्या करमाळा तालुक्यात मटका ,गुटखा, वाळू ,जुगार, चक्री, मावा ,बनावट दारू, बेकायदेशीर लॉजिंग, वेश्याव्यवसाय आदी सर्व बेकायदेशीर अवैध धंदे जोमाने सुरू असून काही वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सदर धंदे करणाऱ्या लोकांना वरदहस्त असून मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोडी करून माया गोळा केली जात आहे. त्याच बरोबर करमाळा पोलीस ठाणे येथे आर्थिक प्राप्ती करण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाणही वाढले आहे, तसेच सर्वसामान्य जनतेस पोलीस ठाण्यात गेले असता लज्जास्पद ,अपमानास्पद वागणूक देऊन धमकिवजा भाषा वापरली जाते त्याच बरोबर या त्यांच्या अन्यायाबद्दल आवाज उठवला असता असे धंदे करणाऱ्यांकडून दमबाजी, जिवेमरण्याची धमकी दिली जाते .तसेच अधिकाऱ्यांकडून कायद्यांच्या बडगा दाखवून कोणत्याहि खोट्या गुन्हात अडकवून त्रास दिला जाईल,धिंड काढली जाईल मारहाण केली जाईल ,अशी धमकी दिली जात असल्याचे बोलले जाते.
तरी आपण सूज्ञ व समजूतदार आहात आपल्याकडून या सर्व प्रकारास पायबंद बसेल व आम्हास योग्य न्याय भेटेल ही अपेक्षा. सदर सर्व प्रकाराची सखोल चौकशी होऊन धंदे करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी तसेच त्यांना पाठीशी घालणारे व धमकी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर खातेनिहाय चौकशी करून दोषींवर कारवाई करून कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांना अधिकाऱ्या व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी दिनांक ०६/११/२०२० गुरुवार रोजी स.११ वा. तहसील कार्यालय करमाळा येथे आमरण उपोषण करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.
0 Comments