“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सुज्ञ आहेत. शिवाय राज्यपालांवर आमचं प्रेम असून त्यांचंही आमच्यावर प्रेम आहे. त्यामुळे ते महाविकासआघाडीच्या नेत्यांनी राज्यापाल नियुक्त १२ सदस्यांची नावं नाकरणार नाहीत,” असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केलाय.
संजय राऊत पुढे म्हणाले, “या प्रेमातून याच्या पुढे सर्व कारभार सुरळीत पार पडेल. आम्ही राज्यपालांचा नेहमी आदर करत असतो. त्यामुळे राज्यपाल घटनाबाह्य काम करणार नाहीत.”
शिवसेनेच्या यादीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचं नाव आहे. त्यांच्यासारख्या स्पष्टवक्ताजर विधानसभेतत जाईल, तर त्याचा निश्चितच फायदा होईल, असंही राऊत यांनी सांगितलंय.
0 Comments