राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी एकनाथ खडसेंचे नाव राष्ट्रवादीकडून पाठवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन खडसेंच्या नावाला विरोध केला आहे.
राज्यपालांच्या भेटीनंतर अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्या म्हणाल्या, ”प्रसारमाध्यमात राज्यपाल नियुक्तीसाठी १२ नावं गेलेली आहेत, त्यातलं एक नाव एकनाथ खडसे आहे अशा बातम्या येत आहेत, मात्र खडसेंचे नाव येणं हे संतापजनक आहे, भ्रष्टाचारी नेत्याला पुन्हा राजकारणात राष्ट्रवादी आणू पाहतेय, त्यांच्याविरोधात निवेदन देण्यासाठी मी राज्यपालांची भेट घेतली.
भ्रष्टाचाराविरोधातील लढ्याला खडसेंसारखे नेते पुन्हा राजकारणात आले आणि सक्रीय झाले तर काहीच अर्थ राहणार नाही, त्यामुळे माझे निवेदन आणि कागदपत्रे राज्यपालांना दिली आहेत” असं त्यांनी सांगितलं.
0 Comments