जेऊर/प्रतिनिधी:
जेऊर मध्ये गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोंढेज रोडवरील ओढ्यालागत असलेल्या मुस्लिम बांधवांच्या दफनभूमी ची भिंत ओढ्यात जास्त पाणी आल्याने दाब येऊन पडली असून आज २० दिवस झाले तरी ग्रामपंचायत ने याकडे पूर्ण दुर्लक्ष केले असून आम्ही संभाजी ब्रिगेड तालुका कार्याध्यक्ष बालाजी गावडे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री व आमदार यांच्या कडे तातडीने १८/१० /२०२० तारखेला निवेदन देऊन हे काम करावे अशी मागणी केली होती, त्यास प्रतिसाद देत माननीय आमदार संजय मामा शिंदे यांनी ग्रामपंचायत चा प्रस्ताव द्या काम मार्गी लावतो. असे अभिवचन दिले आहे तसा प्रस्ताव ग्रामपंचायत ने आज पर्यंत दिला नाही, किंवा सदर काम व्हावे म्हणून काही प्रयत्न करत आहेत असेही दिसत नाही तरी ग्रामपंचायत ने तातडीने विशेष सभा बोलावून त्यात ठराव पास करून तसा प्रस्ताव पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्याकडे पाठवावा.
सदर दफनभूमी जवळपास मुस्लिम समाजाला निषिद्ध अशा प्राण्यांचा वावर असतो, त्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये. म्हणून तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसा काही अनुचित प्रकार घडला तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ग्रामपंचायत जेऊर यांची असेल, शासकीय पातळीवर भिंत बांधकाम करनेस विलंब होत असेल तर ग्रामपंचायत ने तार कंपाउंड बांधून सदर दफनभूमी चे संरक्षण करावे, काम न केलेस करमाळा पंचायत समिति समोरआमरण उपोषण करणार बाळासाहेब एकनाथ करचे, देवानंद महादेव जाधव पाटील, बालाजी चंद्रकांत गावडे यांनी माहिती दिली.
0 Comments