सनी लिओनीने मतदान केल्याचे फोटो शेअर करत म्हणाली; कोण राष्ट्राध्यक्ष होणार..??


अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणूकी रिपब्लिकन पक्षाचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विजयी होणार की, ‘अमेरिकन ड्रीम’ म्हणजे सर्वसमावेशक अमेरिकेची खंडित परंपरा पुढे नेणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार व माजी उपाध्यक्ष जो बायडेन बाजी मारणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
 मतदान केल्यानंतर तिने आपल्या पतीसोबत एक फोटो शेअर केला. “कोण विजयी होणार? हा सप्सेंस आता माझा जीव घेईल.” असं म्हणत तिने शेअर केलेला हा फोटो सध्या भारतीय नेटकऱ्यांमध्ये चर्चेच आहे.

सनी लिओनी ही बॉलिवूड सिनेसृष्टीत जरी काम करत असली तरी देखील ती मुळची अमेरिकन नागरिक आहे. चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी ती भारतात येते. दरम्यान हॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकारांनी मतदान केल्यानंतर स्वत:चे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या सर्वांमध्ये सनी लिओनीचा फोटो मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. मी मतदान केलं आहे असं लिहिलेला बिल्ला लावून तिने हा फोटो शेअर केला. तिचा हा फोटो विशेत: भारतीय नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आहे.


Post a Comment

0 Comments