जावयाचा सासूवर बलात्कार; तक्रार दाखल होताच आत्महत्येचा प्रयत्नतामिळनाडूमध्ये ३९ वर्षीय जावयाने आपल्या विधवा ५० वर्षीय सासूवर बलात्कार केल्याची घटना घडली. यानंतर त्याच्यावर पोलिसात तक्रार दाखल झाली तेव्हा त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तामिळनाडूच्या कुद्दलोरे येथे ही घटना घडली. पीडित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रविवारी सासूच्या घरी गेला होता. तेव्हा त्याने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेच्या अंतर्गत भागात जखमा झाल्याने तिला कुद्दलोरे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

 माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती मिळताचा पीडित महिलेची भेट घेत प्राथमिक चौकशी केली. पीडितेने दिलेल्या माहितीवरुन भा. दं. वी. कलम ३७६ अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, आरोपीला गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांनी वेळेत धाव घेतल्याने आत्महत्या करण्यापासून वाचवलं.

Post a Comment

0 Comments