पृथ्वी शॉ चा जन्म ९ नोव्हेंबर १९९९ मध्ये बिहारच्या गया जिल्ह्यात जन्म झाला. पृथ्वीच्या आईचं निधन लवकर झालं. त्याच्या वडिलांनी पंकज शॉ यांनी त्याला सांभाळलं. २०१० मध्ये तो आपल्या वडिलांसोबत मुंबईत शिफ्ट झाला.
संघर्षातच गेलं बालपण
पृथ्वी शॉला कायमच क्रिकेटची प्रॅक्टिस करण्याकरता दररोज ३ तास प्रवास करावा लागत असे. तो मुंबईमध्ये विरार ते चर्चगेट असा प्रवास करायचा.
पृथ्वीने वांद्रे येथील एमआयजी क्रिकेट क्लबमध्ये क्रिकेटचे धडे घेतले. त्याबरोबरच रिझवी स्प्रिंगफील्ड हायस्कूल मुंबईमध्ये अंडर-16 टीममध्ये कॅप्टन पद भूषवलं.
पृथ्वी शॉ बियॉन्ड ऑल बाउंड्रीज डॉक्युमेंट्रीचा भाग राहिला आहे. टीम इंडियाचे माजी क्रिकेटर निलेश कुलकर्णीने २०१० मध्ये पृथ्वी शॉच्या बॅटिंग टॅलेंटला शोधून काढलं.
पृथ्वी शॉच्या कॅप्टन पदात भारतात २०१८ मध्ये अंडर-१९ वर्ल्ड कप आपल्या नावे करून घेतलं.
सर्वात कमी वयात केलं आयपीएल ओपनिंग
२०१८ मध्ये दिल्ली डेअरडेविल्सने पृथ्वी शॉला १.२ करोड रुपयांमध्ये साइन केलं. आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात ओपनिंग करणारा फलंदाज पृथ्वी शॉ आहे. १८ वर्षे आणि १६५ दिवसांत दिल्लीत खेळायला सुरूवात केली.
`नवर्स 99` चा शिकार पृथ्वी शॉ
पृथ्वी शॉने आयपीएल-२०१९ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सच्या विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या मॅचच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये ५५ चेंडूत ९९ धावा केल्या आहे. हा सामना टाय झाला होता. मात्र पृथ्वी टीमच्या सुपरओव्हरमध्ये केकेआरला हरवून आपल्या खात्यात विजय मिळवला.
युवा शतकवीर
सचिन तेंडुलकरनंतर पृथ्वी शॉ सर्वात कमी वयात टेस्ट शतक करणारा भारतीय क्रिकेटर आहे. एवढंच नव्हे तर डेब्यू टेस्टमध्ये शतक करणारा युवा भारतीय आहे.
या दोघांच्या प्रेमाची रंगली चर्चा
पृथ्वी शॉच्या या बातमीची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा रंगत आहे. अभिनेत्री प्राची सिंहला पृथ्वी शॉ डेट करत आहे. या दोघांच्या इंस्टाग्राम पोस्टवरून असं वाटत आहे. पृथ्वी आणि प्राची या दोघांनी याबाबत कोणतीच माहिती दिलेली नाही.
0 Comments