राकेश करमळकर/आजरा:
काळा दिनाच्या निषेधार्थ सीमा भागातील बांधवांना काळे कपडे परिधान करण्यास कन्नडी सरकारने विरोध केल्याने बेळगाव येथील सीमावासीयांनी मराठा मंदिर सभागृहांमध्ये निषेध मेळावा घेतला. महाराष्ट्रातील सर्व मंत्र्यांनी आज काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला तर कानडी सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात निषेध व्यक्त करण्यात आला या घटनेचे पडसाद आजरा शहरामध्ये ही उमटले.
कानडी सरकारने केलेल्या दडपशाहीच्या विरोधात आजरा शिवसेनेचे जिल्हा संघटक संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या येथे आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांनी कन्नड सरकारचा निषेध व्यक्त करत बेळगाव-कारवार संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा व कानडी सरकारच्या धिकाराच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख युवराज पवार, शहर प्रमुख समीर चांद, उपशहर प्रमुख भिकाजी विभुते, रवी यादव, दिनेश कांबळे, युवा सेना प्रमुख ओमकार मध्यालकर शिवसेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments