भाजपा परदेशातून शेती माल आयात करण्यात येतो आहे. पाकिस्तानपेक्षा भजपाला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो अशी घणाघाती टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
केंद्र सरकारने केलेल्या कृषी काय्दायविरोधात पंजाब आणि हरयाणा राज्य पेटून उठलं आहे. तिथे आजही आंदोलनं सुरु आहेत. अद्याप राज्यातील शेतकऱ्यांना या कायद्यांचा चिमटा बसला नाही. मात्र धोका कायम आहे असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. सांगलीमध्ये झालेल्या काँग्रेसच्या आंदोलनात ते बोलत होते.
सध्याच्या घडीला शिल्लक साखरेचा प्रश्न गंभीर असताना निर्यात बंदी केली. याचा अर्थ शेतकऱ्यांची जिरवायची आहे. कांदा आयात करायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानातून कांदा आयात करण्याची चर्चा आहे. म्हणजेच आज देशातील भाजपा सरकारला पाकिस्तानपेक्षा शेतकरी हा त्यांचा मोठा शत्रू वाटतो आहे असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
0 Comments