निवेदनाद्वारे रोहीत पवार यांच्या कडे केली मागणी
करमाळा/प्रतिनिधी:
करमाळा तालुक्यातील शेतकर्यांचे मंदिर असलेला आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची अर्थिक स्थिती चांगली नसल्याने कारखाना भविष्यात चालू होनार की नाही याची शंका तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्याच्या मनात आहे, मागील काही दिवसांपासून कारखाना बारामती अँग्रोला भाडेतत्त्वावर देण्याची चर्चा सर्वत्र चालू आहे,त्यामुळे शेतकर्याच्या चेहर्यावर हसु फुलले आहे,कर्जत जामखेड चे आमदार रोहीत पवार यांच्या बारामती अँग्रोला भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी द्यावा.
अशी मागणी करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यामधुन जोर धरु लागली आहे,याच शेतकर्याच्या मागणीचा विचार करुन राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते महेश काळे पाटील यांनी आमदार रोहीत पवार यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे, यामध्ये विशेषता कुठलाही गट तट न मानता सर्व राजकारण बाजूला ठेवून ही मागणी होत आहे, पवारांचा कारखान्यातील अनुभव, अर्थिक क्षमता, सक्षम यंत्रणा त्यामुळे कामगारांचा प्रश्न सुटुन कारखाना कर्ज मुक्त होईल असा विश्वास तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यान मधुन होत आहे
(Advertise)
यावर्षी ऊजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे,कोळगाव धरणामुळे पूर्व भागातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे,मांगी प्रकल्पात ही १००%पाणी साठाआहे,व तालुक्यातील छोटे मोठे तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत, त्यामुळे पूढील काळात अतिरिक्त ऊसाचा गंभीर प्रश्न तालुक्यापुढे ऊभा राहू शकतो म्हणून आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा चालू होने ही काळाची गरज आहे, नाही तर पुढील हंगामात शेतकर्यांना ऊस बांधावर टाकून देण्याची वेळ येऊ शकते, असे मत निवेदनाद्वारे व्यक्त केले आहे ,त्यामुळे आपण हा कारखाना चालवण्यास घ्यावा व करमाळा तालुक्यातील शेतकर्यांना न्याय मिळवून ध्यावा ही मागणी महेश काळे पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
0 Comments