कोल्हापूर जिल्हा व शहर हेरिटेज कमिटी, रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर, डी.वाय.पाटील कॉलेज, रोटरी क्लब कोल्हापूर, कोल्हापूर हायकर्स, हॉटेल मालक संघ कोल्हापूर, आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटेरिअर डिझाइनर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १९ नोव्हेंबर २०२० ते दि. २५ नोव्हेंबर २०२० या कालावधी मध्ये " जागतिक वारसा सप्ताह" आयोजन करण्यात आलेले आहे.
या सदरच्या उपक्रमा अंतर्गत दिनांक २३ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत "धुण्याची चावी" या ऐतिहासिक ठिकाणी स्वछता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
धुन्याची चावी अशी एक ऐतिहासिक जागा आहे जिथे लोकांचे कपडे आणि गुरेढोरे धुण्यासाठी विकसित केली गेली होती.
अशा तर्हेच्या अशा अद्वितीय संरचनेमुळेच रंकाळा तलावाच्या पाण्याचे होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत झाली.
कोरोना च्या प्रादुर्भावा मूळे सामजिक आंतर व सुरक्षा नियमांचे पालन करूनच स्वछता मोहिमेचे नियोजन केले असल्याची
माहिती जिल्हा व शहर हेरिटेज कॉन्झर्वेशन कमिटी अध्यक्षा मा. अमरजा निंबाळकर यांनी व रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर चे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी दिली.
अधिक माहिती साठी 9049599792, 8390369999 या नंबर वरती संपर्क साधावा.
0 Comments