सोन्या-चांदीच्या किंमती वधारल्या


 सोमवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या दरात २६८ रुपये प्रति १० ग्रॅम वाढ झाली आहे. चांदीच्या किंमतीही वाढल्या आहेत. एक किलोग्रॅम चांदीचे दर १६२३ रुपयांनी वाढले आहेत. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशात सोन्या-चांदीचे दर वाढले असून भारतीय बाजारातही त्याचा परिणाम पाहायला मिळतो आहे.

 सोन्याचे आजचे दर

दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या किंमतीत प्रति १०  ग्रॅम २६८ रुपयांची वाढ झाली असून ९९.० ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर ५०,८१२ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचला आहे. शुक्रवारी सोन्याचा दर ५०,५४४ रुपये इतका होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर १८७३ डॉलर प्रति औंस होता.

चांदीचे आजचे दर  

चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. सोमवारी दिल्ली सराफा बाजारात चांदी १६२३ रुपये प्रति किलोग्रॅम महाग झाली. त्यामुळे चांदीचे दर ६०,७०० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचले आहेत.

का वाढले सोन्या-चांदीचे भाव -


एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, परकीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती सुधारल्याचा परिणाम भारतीय मार्केटवरही झाला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची वाढ आणि अमेरिकेत आर्थिक प्रोत्साहन पॅकेजच्या घोषणेस उशीर होत असल्याने, सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.


 

 

Post a Comment

0 Comments