बार्शी रस्त्यावरील भांडगाव येथील पुलाचे काम प्रगतीपथावर


उस्मानाबाद जिल्ह्यातील  परंडा आणि भूम तालुक्यामधुन पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी आवश्यक असलेला  भांडगाव ते बार्शी रस्त्यावरील भांडगाव येथील पूल प्रवाशांसाठी धोकादायक झाला होता.तसेच या पुलावर सतत अनेक अपघात देखील घडू लागले होते. प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनलेल्या या पुलाचे काम त्वरीत पूर्ण करावे, अशी मागणी वारंवार होत होती.

नागरिकांच्या मागणीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने भांडगाव येथील पुलाचे काम तातडीने  सुरू केले आहे. लवकरचं काम पूर्ण होऊन नागरिकांसाठी प्रवास सुकर होईल अशी परिस्थिती आहे.
    

Post a Comment

0 Comments