देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या एकनाथ खडसेंविरोधात आता भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. एकनाथ खडसें यांनी देवेंद्र फडणवीसांचा द्वेष करणं बंद करावं असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे. ओबीसी म्हणजे एकनाथ खडसे नाहीत असंही ते म्हणाले आहेत.
“भाजपामध्ये देवेंद्र फडणवीसांनी छळले. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे. माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल झाला. तो फडणवीसांनी करायला लावला याचा मनस्ताप झाला. या सर्व मानसिक छळामुळेच पक्षांतराचा निर्णय घेतला,” असं एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडताना सांगितलं. “गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकरांसारखे किती तरी नेते होते. त्यांच्यासोबत आजपर्यंत भाजपचे काम केले. भाजपने मला अनेक मोठी पदे दिली. मी ती नाकारू शकत नाही,” असंही ते म्हणाले होते.
0 Comments