पंढरपूर/प्रतिनिधी:
दारू पिण्याच्या कारणावरून पत्नी सतत बोलत असल्याचा राग मनात धरून पतीने तिचा कुऱ्हाडीने खून केल्याची घटना बुधवारी साडेतीनच्या आसपास पंढरपुरात घडली आहे. मयत महिलेचे नाव राधिका बाबा सावतराव (वय ४९, रा.जुना सोलापूर नाका झोपडपट्टी, हनुमान टेकडी गोशाळा, पंढरपूर, जि. सोलापूर) असे आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबा लक्ष्मण सावतराव हे सतत दारू पित असे, यामुळे मयत राधिका व पती बाबा यांच्यात सातत्याने भांडण होत असे. राधिका सावतराव यांचा पती बाबा लक्ष्मण सावतराव हा सतत दारू पित असे. यामुळे राधिका या बाबा सावतराव यांना दारू पीत असल्याच्या कारणावरून नेहमी बोलत होत्या. बुधवारी झालेल्या दोघांच्या भांडणाचा याचा राग मनात धरून पती बाबा सावतराव हा घरातील लाकडे तोडण्याच्या कुऱ्हाडीने तिच्या डोक्यात घाव घालून तिला ठार मारले.
याबाबत त्यांचा मुलगा शिवम बाबा सावतराव (वय १९) याने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मगदुम हे करीत आहेत.
0 Comments