YES BANK च्या ५० शाखा बंद होणार

 
 येस बँक त्यांच्या ५० शाखा बंद करणार आहे. नवीन व्यवस्थापनाखाली खासगी क्षेत्रातील या बँकने चालू आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये चालू खर्चात २० टक्के कपात करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.


 बँक लीजवर न दिलेल्या जागा परत करत आहे. तसंच भाडेतत्वावर देण्यात आलेल्या जागांचे दर निश्चित करण्यावर चर्चा करत आहे. अनेक मोठे डिफॉल्टर्स कोटात जात असल्याने, मुंबईतील या बँकेला कर्ज वसुली करण्यात अडचणी येत आहेत. 

झालेले घोटाळे :
 
येस बँकेचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी राणा कपूर यांच्या कार्यकाळात, अनेक त्रुटी समोर आल्यानंतर भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्त्वात बँकेत भांडवल भरून या बँकेला वाचवण्यात आलं होतं. त्यानंतर मार्चमध्ये कुमार यांची बँकेचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

मोठे बदल का होत आहेत ?

सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये बँकेचा नफा २१ टक्क्यांनी घसरला. बँकेने मध्य मुंबईतील इंडियाबुल्स फायनान्स सेंटरमध्ये पहिले दोन मजले सोडले आहेत. त्याशिवाय बँक सर्व ११०० शाखांसाठी नव्या भाडेतत्वासाठी चर्चा करत आहे. या प्रक्रियेमुळे बँकेच्या भाडे खर्चात जवळपास २० टक्के कमी येण्याची आशा असल्याचं, सांगण्यात आलं आहे. एटीएमची संख्याही कमी होऊ शकत असल्याचंही ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments