मेष :
अती विचार करू नका. केवळ आपल्या कामावर लक्ष केन्द्रित करा. कार्यक्षेत्रात मान मिळवाल. मुलांच्या प्रगतीने आनंद होईल.
वृषभ :
कामे मनाप्रमाणे मार्गी लावाल. जमिनीचे व्यवहार कराल. प्रेम संबंधात गैरसमज टाळा. अधिकारी वर्ग सकारात्मक बातमी देतील.
मिथुन :
इतरांच्या मदतीला धावून जाल. नवीन कामे हाती येतील. कौटुंबिक सदस्यांशी मतभेद संभवतात. बौद्धिक कसोटी लागू शकते.
कर्क :
लहान प्रवास कराल. वडीलधार्यांना विरोध करू नका. विरोधकांच्या कारवाया मावळतील. हस्तकलेत चिकाटी बाळगा.
सिंह :
तूर्तास धाडसी निर्णय नकोत. कुटुंबासाठी काही खरेदी कराल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवीन विचार तत्काल अमलात आणावा.
कन्या :
किरकोळ गोष्टींमुळे मनस्ताप वाढू शकतो. तडजोडीला पर्याय नाही. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या. मित्रांना मदत कराल.
तूळ :
अघळपघळ शब्द वापरू नका. तुमच्या बुद्धिकौशल्यावर लोक खुश होतील. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. लहान भावंडांना मदत कराल.
वृश्चिक :
मुलांबरोबर वेळ घालवाल. क्रोध वृत्तीत वाढ होऊ शकते. दिवसाची सुरवात मेहनतीत जाईल. जोडीदारासोबत वेळ व्यतीत कराल.
धनु :
नातेवाईकांच्या गाठी पडतील. कौटुंबिक कामाने थकून जाल. मनोकामना पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करा.
मकर :
भावंडांची इच्छा जाणून घ्या. कामात उत्साह जाणवेल. दिवसभराच्या कामाचे चिंतन करा. व्यवसायात चांगला नफा मिळेल.
कुंभ :
योग्य ठिकाणी गुंतवणुकीवर भर द्या. चर्चेतून नवीन कल्पना सुचतील. मानसिक चलबिचलता वाढवू नका. भावंडांची मदत घ्यावी.
मीन :
नियोजनावर अधिक भर द्यावा. सासुरवाडीचे लोक मदत करतील. अनावश्यक खर्चाला आळा घालावा. नवीन कामाची रूपरेषा आखावी.
0 Comments