🐏 मेष :
तुमचा करारी स्वभाव दाखवण्याची संधी मिळेल. नानाविध रंगांनी भरलेला दिवस. रूचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. आहारावर नियंत्रण हवे.
🐐 वृषभ
पैशाचा विनिमय विचारपूर्वक करावा. मोठा निर्णय घेताना एकवार पुन्हा विचार करावा. मित्रांच्या भेटीचे योग. विनाकारण शंका घेऊ नका.
👩❤️👨 मिथुन :
मित्र परिवाराच्या स्नेहाला जपा. व्यावसायिक उन्नती होईल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा.कौटुंबिक वातावरण सामान्य राहील.
🦀 कर्क :
भावंडांची साथ मिळेल. कला जोपासत राहावे. अपेक्षित यशासाठी जोरात प्रयत्न करावेत. ईश्वरावरील श्रद्धा दृढ होईल.
🦁 सिंह :
स्वकर्तृत्वावर झेप घ्या. मित्रांचा सल्ला उपयोगी पडेल. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. दिवसाचा उत्तरार्ध दिलासादायक असेल.
👧 कन्या :
भावनिक गुंतागुंतीत अडकून राहू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल. नोकरीत स्वत:च्या मुद्यावर ठाम रहा. हाताखालील लोक विश्वासू मिळतील.
⚖️ तूळ :
कोणत्याही मुद्यावर संभ्रमित होऊ नका. ठामपणे निर्णय घ्या. आपली इतरांवर छाप पडेल.जोडीदाराशी मतभेदाची शक्यता.
🦂 वृश्चिक :
घरामध्ये मोठी खरेदी कराल. आजचा दिवस चांगला जाईल. कठीण कामे सुरळीत पार पडतील.कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका.
🏹 धनु :
जन संपर्कातून लाभ होईल. कलेत प्राविण्य मिळवाल. आजचा दिवस संमिश्र जाईल. दिवसाच्या उत्तरार्धात चांगली बातमी मिळेल.
🐊 मकर :
पैसे खर्च करताना विचार करावा. योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्या.काही वाद मिटवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. हातातील कामे पार पडतील.
⚱️ कुंभ :
जुनी कामे मार्गी लागतील. जवळच्या व्यक्तीचा सल्ला उपयोगी ठरेल. व्यापारी वर्गाला नवीन अनुभवाला सामोरे जावे लागेल. कामे मनासारखी झाल्याने मन प्रसन्न राहील.
🦈 मीन :
बोलताना पुढच्या-मागच्या गोष्टीचा विचार करावा. लाभाच्या संधी प्राप्त होतील. मानसिक स्वास्थ्य जपावे.अति तिखट पदार्थ खाऊ नका.
0 Comments