HDFC बँकेचे नवे सीईओपदी जगदीशन


एचडीएफसी (HDFC) बँकेत सुमारे २५ वर्षे महत्वाची जबाबदारी सांभाळणारे आदित्य पुरी यांनी शशिधरन जगदीशन यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे.जगदीशन यांना बँकेचे एमडी आणि सीईओपदी नियुक्त करण्यात आले आहे. आदित्य पुरी यांनी २५ वर्षांच्या एचडीएफसीमधील प्रवासामध्ये अनेक महत्वाच्या जबाबदारी सांभाळल्या.

आदित्य पुरी आणि जगदीशन यांनी आभासी (व्हर्च्युअल) पद्धतीने संबोधित केले. यावेळी पुरी यांनी बँकेतील २५ वर्षांच्या कामाच्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान, पुरी यांच्या निवृत्तीचा कार्यक्रम मागील २५ दिवसांपासून सुरु होता. शनिवारी यासाठी ९० मिनिटांच्या व्हर्च्युअल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात बँकेचे सुमारे १ लाखांहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments