विद्यार्थ्यांसाठी Good News, शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा


कोरोना  त्यात आलेला महापूर आणि Online Exam उडालेला फज्जा यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत. तर अनेकांना काही पेपर्स देता आले नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांची काळजी वाढली होती. अशा सगळ्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही १० नोव्हेंबरपूर्वी घेण्यात येईल अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. 

Online Exam साठी ज्या कंपन्यांची निवड केली होती. मात्र परीक्षा योग्य पद्धतीने पार पडल्या नाहीत अश सर्व कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.सामंत म्हणाले, एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल.

विद्यापीठ परीक्षा हाणून पाडण्यासाठी सायबर हल्ला झाला का याचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. परीक्षा योग्य पद्धतीने का होऊ शकल्या नाहीत यासाठी ४ सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे. १० नोव्हेंबरपासून ही समिती काम करणार आहे. सीईटी परीक्षा तालुका स्तरावर कशी करता येईल याविषयी तयारी सुरू केली आहे अशी माहितीही त्यांनी दिली.



 

 

Post a Comment

0 Comments