धोनी पुन्हा होणार किंगमेकर? ७ सामन्यातील पराभवानंतरही CSK ला प्ले ऑफसाठी 'एक' संधी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL 2020) आता प्ले ऑफच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली आहे. जस जशी स्पर्धा पुढे जात आहे, तसा तसा रोमांचही वाढत आहे. मात्र सोमवारी चेन्नई सुपर किंग्सला राजस्थानकडून ७विकेटनं पराभव स्विकारावा लागला. यासह चेन्नईला संघ आता गुणतालिकेत अंतिम स्थानी आला आहे. तर, राजस्थान ८ गुणांसह पाचव्या स्थानी पोहचला आहे.

गेल्या १२ वर्षात पहिल्यांदाच चेन्नईचा संघ गुणतालिकेत अंतिम स्थानी आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघानं १० पैकी ७ सामन्यात पराभव मिळवला आहे.

प्ले ऑफची एक संधी
 CSKचा संघ गुणतालिकेत अंतिम स्थानी असला तरी, त्यांना आता एक संधी आहे. CSKचे ४ सामने शिल्लक आहेत, त्यांना या सामन्यात विजय मिळवून इतर संघाच्या खेळीवर निर्भर रहावे लागणार आहे.   त्यामुळे CSKला प्ले ऑफ गाठण्यासाठी इतर संघाची गरज लागणार आहे. तर त्यांना उर्वरित ४ सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील.

Post a Comment

0 Comments