शिवसेनेच्या वतीने हाथरस येथील दलित युवतीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांची जलदगतीने CBI चौकशी व युपी तील भाजपा सरकार बरखास्त करावे यासाठी निवेदन


सोलापूर/प्रतिनिधी:

हाथरस येथील दलित युवतीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांची जलदगतीने CBI चौकशी करुन कठोरात कठोर शिक्षा देण्याबाबत व उत्तरप्रदेश मधील भाजपा सरकार बरखास्त करण्याबाबत शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

उत्तर प्रदेश मधील हाथरस जिल्ह्यातील चांपा गावात १४ सप्टेंबर रोजी माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. चार नराधमांनी मिळून एका वीस वर्षीय दलित युवतीवर सामूहिक अत्याचार केला. इतक्यावर ते नराधम न थांबता त्यांनी पीडितेचा मणका मोडला आणि जीभही कापली. तिच्याच ओढणीने गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मृत्यूशी झुंज देत असलेल्या पीडितेने मंगळवार दि. २९ सप्टेंबर रोजी प्राण सोडला. थरकाप उडविणाऱ्या या घटनेवरुन नराधमांना असे गैरकृत्य करताना कायद्याचा कुठलाच धाक उरला नसल्याचे जाणवते. पालघर साधुंच्या हत्याकांडाविषयी पुढाकार घेणाऱ्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या राज्यातील माता-भगिनींच्या सुरक्षेकडे देखील लक्ष दिलं पाहिजे अन्यथा रामराज्याऐवजी उत्तरप्रदेशमध्ये रावणराज असल्याचे नागरिकांचे मत बनेल. 
या घटनेची चौकशी सीबीआयकडे सोपविण्यात यावी आणि जलदगती न्यायालयात हा खटला चालवून नराधमांना कठोरात कठोर शिक्षा ठोठावली जावी ही शिवसेनेची मागणी आहे.

छत्रपती शिवरायांचे नाव म्युझियमला देणाऱ्या सरकारने क्रूरकर्मी नराधमांना छत्रपती शिवरायांच्या शासनाप्रमाणे भर चौकात उजवा हात कोपऱ्यापासून अन् डावा पाय गुडघ्यापासून कापून चौरंगा करण्याचे धाडस दाखवावे. दलित भगिनीवर झालेल्या अत्याचारामुळे जनभावना तीव्र आहे याचा विचार करुन लवकरात लवकर कठोर कारवाई व्हावी. 

या प्रसंगी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, गणेश दादा वानकर, महेश कोठे, गुरुशांत धुत्तरगांवकर, प्रताप चव्हाण, भिमाशंकर म्हेत्रे, नाना मस्के, विजय पुकाळे, विष्णू कारमपूरी, शंकर चौगुले, निरंजन बोद्धूल, प्रथमेश कोठे, चंद्रकांत मानवी, विठ्ठल कोटा, धनराज जानकर, राज पांढरे, परशूराम भिसे, बाळासाहेब गायकवाड, बाळासाहेब माने, संतोष गायकवाड, रोहित तडवळकर, दत्ता खलाटे, संताजी भोळे, विक्रांत गायकवाड, सचिन सुरवसे, हणमंतू जवंजाळ, तौस पाक हुंडेकरी, प्रशांत चव्हाण, अजय आमनूर, रवि हक्के, आदि शिवसैनिक मोठ्या संख्याने उपस्थिती होते

Post a Comment

0 Comments