शेतकार्याना भरीव मदत करा : माजी खा.राजू शेट्टी


पंढरपूर/प्रतिनिधी:

शेती नुकसानीच्या पाहणी न करतात, शेतकऱ्यांना तात्काळ भरीव मदत जाहीर करावी. केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने शेतक-यांना मदत न दिल्यास आम्ही रस्त्यावरची लढाई लढू, अशा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. 

 भीमा नदीला पूर आल्याने नुकसान झालेल्या शेतकºयांच्या पिकांची पाहणी करण्यासाठी खा. राजू शेट्टी पंढरपूरला आले होते. सचिन पाटील, तानाजी बागल, विजय रणदिवे, रणजित बागल, विष्णु बागल, प्रताप गायकवाड, साहेबराव नागणे, रायप्पा हळणवर उपस्थित होते.

पुढे राजू शेट्टी म्हणाले, हवामान खात्याने दिलेल्या ईशाºयाकडे जिल्हा व आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. भीमा नदीला दुपारी ५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले होते आणि रात्री अचानक लाखाचा विसर्ग सोडण्यात आला. नागरिक जीव जाण्याच्या भीतीने तत्काळ स्थलांतरित झाले. 

याबाबत ते म्हणाले, 'अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोलमडलेल्या शेतक-यांना पुन्हा उभे करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीची गरज आहे. राज्य सरकारने १५ हजार कोटी रुपये व केंद्र सरकारने केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून ३५ हजार कोटी रुपयाची भरपाई द्यावी.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्याआधी मागील वर्षी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती. आता तर ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी. केंद्र सरकारनेही हात झटकू नयेत. सरकारने वेळीच मदत न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून लढाई लढेल.'असेही शेट्टी म्हणाले.

Post a Comment

0 Comments