मुलीला त्रास देण्यासाठी जनतेचे ८२ लाख उडवले हे अत्यंत दुर्दैवी - कंगना राणावत



 अभिनेत्री कंगणा राणावतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने कारवाई केल्यापासून कंगणा ठाकरे सरकार आणि मुंबई महापालिकेवर टीका करत आहे. अशातच पुन्हा एकदा कंगणाने राज्य सरकार आणि महापालिकेवर निशाणा साधला आहे.

बीएमसीने माझे कार्यालय बेकायदेशीरपणे पाडण्यासाठी वकिलांवर आत्तापर्यंत ८२ लाख रुपये खर्च केले आहेत. एका मुलीचा छळ करण्यासाठी पप्पाचा पप्पू सार्वजनिक पैशांचा वापर करत आहे. हे अत्यंत दुर्दैवी असल्याचं कंगणाने म्हटलं आहे. 

भाजपनेही वकिलांच्या खर्चावरून मुंबई महापालिकेवर टीका केली होती. त्यावर पैसे खर्च केले नसते तर मग ती जे आरोप करतेय ते मान्य करायला लागले असते. भाजपला डबल ढोलकी वाजवायला आवडते वाटतं, असं प्रत्युत्तर दिलं होतं.

Post a Comment

0 Comments