दरवर्षी भगवान गडावर भगवान बाबांचे भक्त आणि मुंडे समर्थकांचा भव्य दसरा मेळावा होत असतो. कोरोनामुळं यंदाचा दसरा मेळावा आपआपल्या घरी, गावात भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होत सर्वानी साजरा करायचे आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
”दरवर्षीप्रमाणे आपण दसऱ्या मेळाव्याची वाट पाहत असता. मी सुद्धा या मेळाव्याची वाट पाहत असते. पण, यंदा राज्यावर कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा हा वेगळ्या पद्धतीने आपण साजरा करत आहोत ,असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले. मी स्वत: भगवानगडावर जाऊन दर्शन घेणार आहे आणि तिथूनच फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह येऊन तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करणार आहे, अशी घोषणा पंकजा यांनी केली.
”दरवर्षीप्रमाणे आपण दसऱ्या मेळाव्याची वाट पाहत असता. मी सुद्धा या मेळाव्याची वाट पाहत असते. गोपीनाथ मुंडे यांनी ही परंपरा सुरू केली आहे, ती आपण पुढे नेण्याची आपली जबाबदारी आहे. पण, यंदा राज्यावर कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाच्या परिस्थिती असल्यामुळे यंदा तुम्हा सर्वांचे आरोग्य मला धोक्यात घालायचे नाही. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा हा वेगळ्या पद्धतीने आपण साजरा करत आहोत. आपआपल्या घरी, गावात भगवान बाबांच्या चरणी सर्वांना नतमस्तक व्हायचे आहे. भगवान बाबांचे पूजन करायचे आहे मोठ्या संख्येनं हा कार्यक्रम करायचा आहे”, असं आवाहन पंकजा मुंडेंनी केले.
0 Comments