कोल्हापुरात सकल धनगर समाजातर्फे रास्ता रोको


कोल्हापूर जिल्ह्यातील पुलाची शिरोली नजिकच्या सांगली फाटा येथे दिनांक आज दिनांक १६ ऑक्टोबर रोजी सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर आरक्षण प्रश्नी रास्ता रोको करण्यात आला .गेल्या ७३ वर्षापासून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षणापासून वंचित ठेवले आहे व त्वरित धनगर समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षण देऊन प्रमाणपत्र द्यावे या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले .
तरी या मागणीची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी अशी कोल्हापूर जिल्ह्यातील सकल धनगर समाजाची मागणी आहे. त्याचबरोबर मेंढपाळा वरती होणारे सतत हल्ले शासनाने तात्काळ यांचा बंदोबस्त करावा,धनगर समाजासाठी १ हजार कोटीची तरतूद करून अंमलबजावणी करावी आणि धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण लागू करूनच शासनाने भरती प्रक्रिया करावी .व धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना स्वयं योजनेची अंमलबजावणी करावी .या प्रमुख मागण्यांचे निवेदन हातकलंगले तहसीलदार यांना सादर करण्यात आले .

याप्रसंगी प्रा. शंकरराव पुजारी, प्रा. मंगेश हजारे, शहाजी सिद्ध, उद्योजक निवास वाटेगावकर, मंगेश हजारे, निखिल पुजारी, अजय हराळे यांच्या सह कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो धनगर बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments