विधवा सुनेच्या अनैतिक संबंधाला वैतागून सासऱ्याने मुलाकरवी सून आणि तिच्या प्रियकराला ट्रॅक्टरखाली चिरडून टाकल्याची घटना घडली. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चापडगाव शिवारत ही धक्कादायक घटना घडली.सासऱ्याने ही हत्या अपघात असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रियकराने मृत्यूपूर्वी आईला खरी हकिगत सांगितली आणि सासऱ्याचं पितळ उघड पडलं. या प्रकरणी सासरा आणि दुसऱ्या मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे.
भागवत प्रल्हाद हरबक आणि मारिया विनोद लालझरे अशी मृतांची नावं आहेत. मारियाच्या पतीने दहा वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. भागवत हे लालबावटा संघटनेचे चापडगावचे अध्यक्ष होते. बुधवारी संघटनेचा कुंभारपिंपळगावला मेळावा होता. त्यामुळे भागवत आणि मारिया हे दोघे दुचाकीवर मेळाव्याला गेले. पण, दीड तासानंतर भागवतच्या दुचाकीचा अपघात झाला, अशी बातमी कुटुंबियांना समजली.
0 Comments