अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून पाहणी


 खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधत धीर दिला.तसेच जिल्हा प्रशासनाला नुकसान झालेल्या सर्व क्षेत्राचे सरसकट पंचनामे करण्याचे शेतकऱ्यांना शासनाकडून व विमा कंपनीकडून योग्य ती नुकसान भरपाई वेळेतच कशी मिळेल या बाबत दक्षता घेण्याचे निर्देश खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिले. 
उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अतिवृष्टिमुळे पिकांचे, घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 
सिंदफळ ता. तुळजापूर येथील अनेकांना त्याचा फटका बसला आहे. खा. ओमराजे यांनी शेतकऱ्यांना धीर देत जिल्हा प्रशासनाला नुकसान झालेल्या सर्व क्षेत्राचे सरकट पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. तुळजापूर तालुक्यातील विविध गावांची पाहणी त्यांनी केली.

शेतकऱ्यांना शासनाकडून व विमा कंपनीकडून योग्य ती नुकसान भरपाई वेळेतच कशी मिळेल या बाबत दक्षता घेण्याचे निर्देश खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिले. 
 




Post a Comment

0 Comments