करमाळा तालुक्यात पावसामुळे झालेल्या पिकांचे पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी : हाजी उस्मानशेठ तांबोळीकरमाळा/प्रतिनिधी:

करमाळा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने ग्रामीण भागातील अनेक शेतकरीचे पिकांचे नुकसान झाले आहे, तसेच अतिवृष्टी मुळे ओढे नाले पाण्याने भरून वाहू लागलेने सदरचे पाणी शेतीत घुसल्याने शेतीचे बांध फुटले पर्यायी पाण्यामुळे शेतीतील माती वाहुन गेले, तर पिकांचे नुकसान झाले आहे तरी शासनाने ताबडतोब पिकांचे व शेतीतील झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्यात वेळ न घालवता शेतकरी ना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पुणे शहर काँग्रेस  कमिटीचे चे शहर उपाध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडे केली आहे.

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, करमाळा तालुक्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे ओढे नाले व नदीला मोठया प्रमाणात पाणी आले आहे. तालुक्यातील कुंभेज, मांगी, वडशिवणे, म्हसेवाडी, नेर्ले,  विट आदी छोटे मोठे तलाव तुडुंब भरली आहे. तर सीना नदी भरून वाहत आहे कोळगाव उजनी जलाशय १००% भरले आहे. परंतु या पावसाने नुकत्याच पेरणी केलेल्या ज्वारी कांदा तुर या पिकांचे नुकसान केले आहे. तर फळबागा, तरकारी भाजी पाला, ऊस, केळी याचेही नुकसान केले आहे. तर अनेक गावात पावसामुळे शेतकरी ची घरे सुध्दा पडली आहे.  झालेल्या पावसामुळे तालुक्यातील पोथरे, आळजापुर, खडकी, कामोणे, बिटरगाव, मांगी, वडगाव, रावगाव, पिंपळवाडी, मोरवड, पौधवडी, रोशेवाडी, तरटगाव, बाळेवाडी, निलज तसेच अनेक गावात पावसामुळे नुकसान झाले आहे. आता शेतकरी ना दुबार पेरणी करावी लागणार आहे तरी शासनाने त्यांना  दर्जेदार मोफत बियाणे द्यावे. तसेच नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात वेळ न घालवता शेतकरी ना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पुणे शहर काँग्रेस कमिटीचे शहर उपाध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments