सुशांतने आत्महत्या केल्याचं सिद्ध झाल्यानंतर कंगनाने उपस्थित केले 'हे' तीन प्रश्न
एम्सने सीबीआयला सुपूर्द केलेल्या अहवालामुळे अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणाला आज नवं वळण मिळालं आहे. एम्सच्या अहवालातून सुशांतने आत्महत्याच केली असल्याचं सिद्ध झालं असून यामुळे त्याचा खून झाला असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत मृत्यूबाबत एम्सने सादर केलेल्या अहवालानंतर अभिनेत्री कंगना रानौतने तीन प्रश्न उपस्थित केले आहेत.

कंगनाने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर, '(१) सुशांत अनेकदा मोठ्या प्रोडक्शन हाऊसेसने त्याच्यावर बंदी लादल्याच बोलला आहे. त्याच्याविरोधात असा कट करणारे हे लोक कोण आहेत? (२) माध्यमांनी सुशांत बलात्कारी असल्याची खोटी बातमी का पसरवली? (३) महेश भट यांनी सुशांतच्या मानसिकस्थितीबाबत वक्तव्य का केले?' हे तीन प्रश्न उपस्थित केले आहेत.

'तरुण आणि विलक्षण कौशल्य असणाऱ्या व्यक्ती असेच एखाद्या दिवशी उठून सहज आत्महत्या करत नसतात. त्याला ऐकत पडण्याचा प्रयत्न होत असल्याचं सुशांतने  म्हंटल होत. त्याला त्याच्या जीविताची भीती होती. मुव्ही माफियांनी आपल्यावर बंदी लादून आपली छळवणूक केल्याचं तो म्हंटला होता. बलात्काराचे खोटे आळ लावल्याने तो मानसिकरीत्या खचला होता.' असा दावा देखील कंगनाने ट्विटरद्वारे केला आहे.
 

Post a Comment

0 Comments