"महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न"



प्रा.डॉ.प्रभाकर माने/जयसिंगपूर-

 शनिवार दि.१० रोजी  'मित्र', पार्श्वनाथ नगर, सांगली-मिरज रोड,मिरज येथे सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा मोठ्या आनंदाने संपन्न झाला.या विवाहाचे सत्यशोधक  पद्धतीने  विवाहकार्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सांगली यांच्याद्वारे पूर्ण केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते मा.कृष्णात कोरे यांनी हा विवाह सोहळाचे सत्यशोधक पद्धतीने सर्व कार्य संपन्न केले. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या विवाहास निवडक नातेवाईक, अंधश्रद्धा निर्मूलन समिती व पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
     
मुळात प्रा.डॉ.सुभाष जाधव हे पुरोगामी चळवळीचे खंदे कार्यकर्ते व नेते म्हणून तसेच त्यांच्या विद्यार्थिदशेपासून विविध आंदोलने,मोर्चे व पुरोगामी चळवळीच्या माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात निर्माण केला. त्यांनी समाजातील वंचित घटक, अनुसूचित जाती -जमाती व भटक्या विमुक्त जाती, महिला,कामगार व विशेष करून ऊस तोडकरी कामगार यासाठी किसान सभेच्या माध्यमातून केलेलं काम उल्लेखनीय आहे. यासाठी त्यांची सुविद्य पत्नी  अडव्होकेट सौ. जाधव  यांनी त्यांना मोलाची साथ व  पाठिंबा देऊन चळवळीला उभारी देण्याचा कार्य केले आहे. त्याचबरोबर प्रा.जाधव यांनी एम. फुकटो व सुटा या संघटनेच्या माध्यमातून प्राध्यापकांच्या न्याय व हक्कासाठी  केलेले काम वाखाणण्याजोगे आहेच. प्रा.सुभाष जाधव आणि संघर्ष हे समीकरण बनलेले असून त्यांचं हे समाजसेवेचे कार्य सातत्याने व  अविरतपणे सुरू आहे.त्याचाच एक भाग म्हणून सरांनी कोरोनाच्या काळात ही अनेक आंदोलनाचे नेतृत्व करीत आपले कार्य सुरू ठेवले आहे. तसेच प्रा.डॉ.जाधव पुणे शिक्षक मतदारसंघातून इच्छुक उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
  
श्री.व सौ.जाधव यांनी सामाजिक बांधिलकी व मानवतावाद या हेतूने प्रेरित होऊन त्यांचे हे कार्य छोट्या-मोठ्या पद्धतीने सुरू आहे.त्यांनी आपली पुरोगामी संघटना व  वैचारिक लढाईची सूत्रे पुढच्या पिढीला देण्यासाठी त्यांनी  आपला मुलगा श्री.शैलेन याचा विवाह पिसे परिवार यांची कन्या कु.सुजाता हिच्याशी काही मोजक्या नातेवाईक, पुरोगामी व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या आनंदात सत्यशोधकीय पद्धतीने विवाह सोहळा संपन्न  केला.सध्याच्या काळात स्वार्थाने बरबटलेल्या  व प्रचंड मोठ्या थाटामाटात लग्न करण्याचे स्वप्न उराशी बाळगून विवाह कार्य करणारे घटक एका बाजूला व दुसऱ्या बाजूला सामाजिक बांधिलकी व विवाह  कार्याच्या खर्चाला बगल व फाटा देत आगळ्यावेगळ्या समाज उत्थानासाठी महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांना आदर्श मानून त्यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा संपन्न केला. हे आजच्या पिढीला एक आदर्श निर्माण करणारा विवाह आहे असे या ठिकाणी वाटते.या विवाह सोहळ्यात  श्री. व सौ.जाधव, श्रीमती.सुवर्णा पिसे, आकाश पिसे,सौ.माधुरी देशमुख  कॉम्रेड, उमेश देशमुख, आबासाहेब चौगुले,चंद्रकांत जाधव,महादेव गायकवाड ,प्रा. डॉ. संतोष जेठीथोर , रवींद्र माने,किशोर माने व कृष्णात कोरे व इतर पुरोगामी चळवळीतील निवडक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

1 Comments