बायकोचं बाहेर होतं अनैतिक संबंध : बदनामीच्या पोटी नवऱ्याने केली आत्महत्यापत्नीच्या अनैतिक संबंधामुळे समाजात बदनामी झाल्याचा अपमान सहन न झाल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विलास नवनाथ भोळे हेऔरंगाबाद मधील  मुकुंदनगर भागात पत्नी रोहिणीसोबत राहतात. काही वर्षांपूर्वी दोंघाच लग्न झालं होत. सुरुवातीला काही वर्षे आईवडिलांच्या सोबत हे जोडपं राहत होते. 

पण घरच्यांशी पटत नसल्याच्या कारणावरून ते दुसरीकडे राहत होते. पती दिवसभर काम करण्यासाठी जात असे. पतीबद्दल त्याला अनेक तक्रारी येत होत्या. समाजात वाईट बोलले जात होते. यामुळे ते खूप वाईट मनःस्थितीत असल्याची चर्चा परिसरात होती. काल दुपारी एकच्या सुमारास विलास घरी आला असता, त्यांनी पत्नीला तिचा प्रियकर गणेश गोरे सोबत घरात गप्पा मारताना पाहिले. त्यांनी गणेश गोरे इथे काय करतो असे विचारले. त्यावरुन दोघांनी विलास यांना शिवीगाळ व मारहाण केली. याचा राग आल्याने विलास हे वडील नवनाथ त्रिंबक भोळे यांच्या घरी आले. घरात माणसं इकडे तिकडे गेल्यावर खोलीत जाऊन गळफास घेतला. बंद खोलीत हा काय करतो हे बघण्यासाठी गेले असता त्यांना विलासचा मृतदेह आढळला. 

ही घटना घडल्यानंतर नवनाथ भोळे यांनी मंगळवारी सायंकाळी मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठले. सून रोहिणी व तिचा प्रियकर गणेश गोरे यांच्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments