मोदी सरकार सोन्याची अंडी देणाऱ्या सरकारी कंपन्या विकतेय फक्त हव्यासापोटी - रोहित पवार



केंद्रातील मोदी सरकार सध्या निर्गुंतवणूकीकरणाला चालना देत आहे. सरकारी मालकीच्या कंपन्यांचा हिस्सा केंद्र सरकार विकायला काढत आहे. यात आर्थिक संकटात असलेल्या एअर इंडिया तर नफ्यात असलेल्या भारत पेट्रोलियम सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. दरम्यान मोदी सरकारच्या या निर्गुंतवणूकीकरण धोरणाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोध दर्शविला आहे. 

सोशल मीडियावर याबाबत एक सविस्तर पोस्ट लिहत मोदी सरकाराच्या खाजगीकरणाच्या धोरणाचा लेखाजोखा त्यांनी यात मांडला आहे. ”नफ्यात असणाऱ्याही कंपन्या विकताना सरकार मागं-पुढं बघत नाही. सरकारी कंपन्या या महसुलाच्या दृष्टीने सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबड्या आहेत, परंतु हव्यासापोटी या कंपन्यांचं खाजगीकरण करून सोन्याची अंडी देणाऱ्या कंपन्या केंद्र सरकार कापताना दिसतंय अशा शब्दात रोहित यांनी आपल्या पोस्टमध्ये मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
”केंद्र सरकारकडून एअर इंडिया पासून तर भारत पेट्रोलियम पर्यंत सर्वच सरकारी मालकीच्या कंपन्यांचं पद्धतशीरपणे खाजगीकरण करण्याचं धोरण मोठ्या वेगाने सुरुय. केंद्र सरकार या प्रक्रियेला निर्गुंतवणूकीकरणाचं गोंडस नाव देण्यात आलं असलं तरी हे प्रत्यक्षात मात्र हे केंद्र सरकारच्या आर्थिक डबघाईचं आणि ठराविक खाजगी कंपन्यांना रान मोकळं करण्याचं धोरण आहे.

Post a Comment

0 Comments