हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीनपदी भारतीय वंशाचे श्रीकांत दातार


अमेरिकेतील प्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीनपदी भारतीय वंशाचे श्रीकांत दातार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.दातार हे मावळते डीन नितीन नोहरिया यांची जागी घेणार आहेत. दातार हे बिझनेस स्कूलचे ११ वे डीन आहेत.भारतीय वंशाचे नोहरिया यांनी २०१० ते २०२० दरम्यान बिझनेस स्कूलचे डीन म्हणून काम पाहिले.आता सलग दुसऱ्यांदा ११२ वर्ष जुन्या हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीनपदी भारतीय वंशाच्या व्यक्तीची नियुक्ती झाली आहे. ते १ जानेवारी पदभार स्वीकारणार आहेत.याबाबतची माहिती हार्वर्ड विद्यापीठाच्या अध्यक्ष लॅरी बॅकोव यांनी दिली आहे.

 श्रीकांत दातार हे एक नाविन्यपूर्ण शिक्षक, एक प्रतिष्ठित विद्वान आणि एक अनुभवी शैक्षणिक नेते आहेत, असे बॅकोव यांनी दातार यांची नियुक्ती जाहीर करताना म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments