सैराटमधल्या लंगड्याच्या नशीबात कसली सुंदर हिरोईन आलीय बघा.....


‘सैराट’ चित्रपटात इतर कलाकारांप्रमाणे तानाजी गळगुंडे  प्रकाश झोतात आला. अनुप जगदाळे लिखित आणि दिग्दर्शित ‘भिरकिट’ या चित्रपटातून मोनालिसा बागलसोबत रूपेरी पडद्यावर झळकण्यासाठी तयार आहे.
तानाजी आणि मोनालिसा पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत आहेत. अनुप जगदाळे दिग्दर्शित “भिरकीट” या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.

 ड्राय डे, परफ्यूम, गणू, झाला बोभाटा, टोटल हुबलाक अशा चित्रपट आणि टीव्ही मालिकेतून मोनालीसा बागल महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. तर तानाजीने ‘सैराट’ च्या दक्षिणेकडच्या रिमेकमध्ये म्हणजे “मनसु मल्लिगे’ मध्येही त्याने दमदार भूमिका साकारत रसिकांची मनं जिकली होती.

आता भिरकीट चित्रपटातून तानाजी सोबत मोनालिसाची केमिस्ट्री कशी जुळून येते हे पाहणे आता महत्त्वाचं ठरत आहे. चित्रपटाच्या मोशन पोस्टरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

Post a Comment

0 Comments