मुंबई- सिटी सेंटर मॉलमध्ये अग्नितांडव, ११ तासांपासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरुमुंबई सेंट्रलच्या नागपाडा परिसरातील सिटी सेंटर मॉलमध्ये काल रात्री ९ च्या सुमारास भीषण आग लागली. गेल्या तब्बल ११ तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अजूनही या मॉलला लागलेली आग नियंत्रणात आलेली नाही. 

मॉलच्या नजीक असलेल्या आॅर्किड एवकेव्ह इमारतीतील ३५०० हून अधिक लोकांची सुटका करण्यात आलीये. दरम्यान आग विझवताना अग्निशमन दलाचे २ कर्मचारी जखमी झालेत. सिटी सेंटर मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर मोबाईलच्या दुकानाला काल रात्रीच्या सुमारास ही आग लागली. काही वेळातच या आगीने रौद्र रूप धारण केलं. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.

Post a Comment

0 Comments