धक्कादायक! २० पानी सुसाईड नोट लिहून नायब तहसीलदाराच्या मुलाची आत्महत्या



औरंगाबादमधील माजी निलंबीत नायब तहसीलदाराच्या मुलाने २० पानी सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. साहेबराव देशटवाड असे मृत मुलाचे नाव आहे. वडिलांवर दाखल गुन्ह्यात त्यांना शोधण्यासाठी घरी आलेल्या पोलिसांनी छळ केला. मित्र आणि मैत्रिणींनी ब्लॅकमेल केले. अशी २० पाणी सुसाईड नोट लिहून २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

मृत साहेबराव देशटवाड ह शनिवारी (२४ ऑक्टोबर) रात्री दुसऱ्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले होता. तो बराच वेळ खाली आला नसल्याने नातेवाईक त्यांना पाहण्यासाठी गेले असता साडीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसले. दरम्यान, मृत्युपूर्वी त्याच्याकडे वीस पानाची सुसाईड नोट आढळली आहे.

तसेच सुसाईड नोटमध्ये नमूद आत्महत्येस जबाबदार असलेल्यांवर गुन्हा नोंदविल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असे देशटवाड यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे.

या सुसाईड नोटमध्ये नमूद केल्यानुसार पैठण येथील तत्कालीन तहसीलदार, प्रेयसी व पैठण पोलीस ठाण्याचे एक फौजदार व पोलीस कर्मचारी यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यानंतरच मयत साहेबरावचा अंत्यविधी करण्यात येईल, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.

Post a Comment

0 Comments