"जयसिंगपूर शहरातील एक भटकी, गतिमंद व मानसिक आजारानेग्रस्‍त महिला उपचाराच्या प्रतिक्षेत"



प्रा.डॉ.प्रभाकर माने/ जयसिंगपूर: 

जयसिंगपूर शहर हे व्यापार, शिक्षण, बँकिंग, औद्योगिक प्रगती व आर्थिकदृष्ट्या संपन्न शहर म्हणून ओळखले जाते. याच शहरांमध्ये गरीब व श्रीमंत यामधील दरी प्रकर्षाने दिसून येते. परंतु जयसिंगपूर शहरवासिय मात्र  छत्रपती शाहू महाराजां सारखेच मोठ्या मनाचे  आहेत.
     
जयसिंगपूर शहरात कोणावर अन्याय होत असेल किंवा संकट काळात मदतीचा हात हवा असेल तर सर्वजण एकत्रित येतात हा मागील अनुभव आहे. परंतु जयसिंगपूर शहरात एक भटकी, गतिमंद व मानसिक आरोग्यग्रस्त असणारी महिला शहरात अन्नासाठी भटकत व सातत्याने बडबडत असते.दिवसा व रात्री विश्रांतीसाठी नगरपालिकेचा नाट्यगृहाचा आधार घेत असते. ऊन, वारा व पाऊस याचा किती त्रास या महिलेस होत असेल याची जाणीव आपणास होणार नाही हे मात्र दुःखदायक आहे. परंतु नगरपालिकेतील सर्व नगरसेवक ,प्रशासकीय अधिकारी, सेवक व नागरिक हे सातत्याने त्या महिलेला पाहत असतात. 

परंतु कोव्हीड-१९च्या महामारीमुळे कामाच्या प्रचंड व्यापामुळे कदाचित त्या महिलेच्या आरोग्य प्रश्नाविषयी त्यांना जाणीव झाली नसेल. मात्र कुणी तरी या महिलेचा वाली किंवा देवदूत बनून त्या महिलेला योग्य आरोग्यविषयक  उपचार देण्याची आवश्यकता आहे. या अगोदरही अशा दोन महिलांना जयसिंगपूर वासियांनी आधार देऊन त्यांना त्यातून मुक्त केलं होतें.अशा प्रकारच्या मदतीची आवश्यकता या महिलेला देखील आहे हे लक्षात ठेवण्याजोगे आहे. सदर महिला शारीरिक व मानसिक आरोग्याच्या  प्रतीक्षेत आहे.आपल्या सारख्या संवेदनशील मनाच्या लोकांनी हे कार्य पुढे होऊन पूर्ण करावे व  या दुर्धर आजारातून या महिलेची सुटका व्हावी अपेक्षित असून यासाठीचे हे मनापासून आव्हान आहे.

Post a Comment

1 Comments