सोलापूर जिल्यातील १ हजार १३४ गावांपैकी ९२२ गावांत आजपर्यंत कोरोना दाखल


बार्शी /प्रतिनिधी:


सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. सोलापूर जिल्ह्यात असलेल्या एकूण १ हजार १३४  गावांपैकी तब्बल ८१ टक्के गावे कोरोना बाधित झाली आहेत. जिल्ह्यातील ९२२ गावांमध्ये कोरोना दाखल झाला आहे. ३०सप्टेंबरपर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीनूसार ही आकडेवारी हाती आली आहे.

चिनमध्ये येणारा कोरोना आपल्या गावात कशाला येईल? अशा एकेकाळी पारावर रंगणाऱ्या गप्पा आता कोरोना कधी जाणार? या विषयावर सुरु झाल्या आहेत. 
देशाचा रिकव्हरी रेट सध्या ८२.४ टक्के आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट ७६.९ तर सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा रिकव्हरी रेट ७३.४ टक्‍यांवर आला आहे. सोलापूर ग्रामीणचा पॉझिटिव्हिटी रेट १३.५ टक्के आहे. देशाचा पॉझिटिव्हिटी रेट ८.४ तर महाराष्ट्राचा पॉझिटिव्हिटी रेट २१.९ टक्के आहे.

सोलापूरच्या ग्रामीण भागात कोरोनामुळे मृत पावणाऱ्या व्यक्तींची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही.

ग्रामीण भागाचा मृत्यूचा टक्का सध्या २.७ एवढा आहे. देशाचा मृत्यूचा टक्का १.४ तर राज्याचा मृत्याचा टक्का २.४ एवढा आहे. सोलापूरच्या ग्रामीण भागातील मृत्यूचा टक्का हा देशाच्या टक्केवारीपेक्षाही अधिक आहे.

तालुकानिहाय कोरोनाची स्थिती 
अक्कलकोट 
एकूण गावे : १४० 
बाधित गावे : ९१ 
कोरोना मुक्त गावे : ४९

बार्शी 
एकूण गावे : १३८ 
बाधित गावे : १२३
कोरोना मुक्त गावे : १५

करमाळा 
एकूण गावे :  ११८
बाधित गावे : ९५ 
कोरोना मुक्त गावे : २३

माढा 
एकूण गावे : १०७
बाधित गावे : ८६
कोरोना मुक्त गावे : २२

मंगळवेढा 
एकूण गावे : ८१
बाधित गावे :  ७४
कोरोना मुक्त गावे : ०७

मोहोळ 
एकूण गावे : १०३
बाधित गावे : ८१ 
कोरोना मुक्त गावे : २२

माळशिरस 
एकूण गावे : ११७ 
बाधित गावे : १०१
कोरोना मुक्त गावे : १६

पंढरपूर 
एकूण गावे : १०१
बाधित गावे : ९२ 
कोरोना मुक्त गावे : ०८

सांगोला 
एकूण गावे : १०२
बाधित गावे : ७९
कोरोना मुक्त गावे : २३


दक्षिण सोलापूर 
एकूण गावे : ८०
बाधित गावे : ७१ 
कोरोना मुक्त गावे : १९

उत्तर सोलापूर 
एकूण गावे : ३६ 
बाधित गावे : २९
कोरोना मुक्त गावे : ०७


कोरोनाचा शिरकाव थोपविलेली सोलापूर जिल्ह्यातील गावे 
अक्कलकोट : डोंबरजवळगे, दहिटणेवाडी, हालहळ्ळी, हसापुर, बोरोटी बु., आंदेवाडी ज., परमानंदनगर, सेवानगर, विजयनगर, चिंचोली मै., म्हेत्रे तांडा, सोळसे तांडा, जकापूर, वसंतराव नाईक नगर, सेवालालनगर, बॅगेहळ्ळी, कोन्हाळी, आळगे, शेगाव, धारसंग, आंदेवाडी खु., आंदेवाडी बु., देवीकवठे, घुंगरेगाव, चिंचोळी न., कुमठे, केगाव खु., चिक्केहळ्ळी, ममदाबाद, इब्राहिमपूर, नागोरे, बिंजगेर, सातनदुधनी, उमरगे, इटगे, हिळ्ळी, मराठवाडी, बादोले खु., काळेगाव, कोळेकरवाडी, कोळीबेट, सांगवी खु., शिरसी, सापळे, सादलापूर, शिरवळवाडी, भुरीकवठे, मातनहळ्ळी, रामपूर. 

बार्शी : पिंपळगाव दे., वाघाचीवाडी, टोणेवाडी, पांढरी, आश्रम तांडा, यमाई तांडा, संगमनेर, भांडगाव, कासारी, चिंचखोपन, भन्साळे, गोडसेवाडी, बेलगाव, वालवड, तावरवाडी, गवळेवाडी. 

माढा : गवळेवाडी, महादेववाडी, लोणी, चांदज, टाकळी, गारअकोले, रुई, आलेगाव खु., निमगाव मा., जामगाव, हटकरवाडी, बादलेवाडी, उजनी मा., जाखले, चौभेपिंपरी, जाधववाडी, रोपळे खु., खैरेवाडी, आहेरगाव, परितेवाडी, भोइंजे, भेंड. 

करमाळा : बोरगाव, बाळेवाडी, भाळवणी, दिलमेश्वर, वडाचीवाडी, दिवेगव्हाण, घारगाव, गोयेगाव, कामोणे, कावळवाडी, कोंढार, चिंचोली, मांजरगाव, मिरगव्हाण, पारेवाडी, पोटेगाव, रामवाडी, राजुरी, सौंदे, सातोली, टाकळी, वडशिवणे, पोंधवाडी. 

मंगळवेढा : जंगलगी, शिवणगी, महमदाबाद शे., महमदाबाद हु., लोणार, पडोळकरवाडी, सिद्धनकेरी. 
माळशिरस : विठ्ठलवाडी, कलंबोली, दत्तनगर, प्रतापनगर, फडतरी, कोथळे, निवटेवाडी, मगरवाडी, हनुमानवाडी, काळमवाडी, साळमुखवाडी, सुळेवाडी, शिवार वस्ती, घुलेनगर, विजयवाडी, झंजेवाडी. 

मोहोळ : सिद्धेवाडी, ढेकळेवाडी, कोंबडवाडी, कुरणवाडी, तेलंगवाडी, खंडोबाचीवाडी, वरकुटे, कोथाळे, शिवनी शिरापूर, खुनेश्वर, भैरववाडी, मनगोळी, दाईंगडेवाडी, सय्यद वरवडे, मुंडेवाडी, नांदगाव, राम हिंगणी, कातेवाडी, जामगाव खु., शिरापूर, वडदेगाव, आरबळी. 

उत्तर सोलापूर : भागाईवाडी, शेरेवाडी, रानमसले, मोहितेवाडी, सेवालाल नगर, तरटगाव, पाथरी. 

पंढरपूर : बिटरगाव, वेणुनगर, सुगाव, जाधववाडी, खरातवाडी, शंकरगाव नळी, विटे, तरटगाव, शेवते. 

सांगोला : मेटकरवाडी, देवकतेवाडी, लिगाडेवाडी, बंडगरवाडी, झापाचीवाडी, आगलावेवाडी, बुरंगेवाडी, भोपसेवाडी, बुरलेवाडी, गावडेवाडी, नराळे, पाचेगाव बु., काळूबाळूवाडी, गुणापवाडी, मिसाळवाडी, नलावडेवाडी, करांडेवाडी, बुद्धेहाळ, जाधववाडी, इटकी, जुनी लोटेवाडी, सातारकर वस्ती, कारंडेवाडी (माहिम). 

दक्षिण सोलापूर : चिंचपूर, बंदलगी, निंबर्गी, बाळगी, खानापूर, संगदरी, गंगेवाडी, ऊळेवाडी, आलेगाव, यत्नाळ, सावतखेड, बसवनगर, गावडेवाडी, दिंडूर, वडगाव, शिर्पनहळ्ळी, तीर्थ, गुद्देहळ्ळी, हणमगाव.

Post a Comment

0 Comments