जबरदस्तीने परीक्षा घेतल्यास परीक्षा केंद्र फोडू; मराठा संघटनांचा इशारा


पंढरपूर/प्रतिनिधी:

राज्य सरकारने ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राज्य लोकसेवा आयोगा परीक्षा रद्द करण्यात याव्यात, 
मराठा आरक्षण प्रश्नी निर्णय होईपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी करतानाच जबरदस्तीने परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला तर परीक्षा केंद्र फोडू, असा इशारा माळशिरस सकल मराठा समाजाकडून राज्य सरकार दिला आहे. 

अकलुज येथे सकल मराठा समाजाकडून टाळ मृदुग मोर्चा व प्रांत कार्यालय जवळ ठिय्या आंदोलन करण्यात आले. यात आंदोलनात मराठा आरक्षण, ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या एपीएससी परीक्षा पुढे ढकलाव्यत, पोलिस भर्ती रद्द कारवी या मागण्यासाठी ठिय्या आंदोलन झाले.  

माळशिरस सकल मराठा समाजाचे समन्वक धानाजी साकाळकर म्हणाले, मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे विविध शैक्षणिक प्रवेश तसेच स्पर्धा परीक्षांबाबत काही प्रश्न तयार झाले आहेत. राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा जाहीर केली आहे.  परीक्षा पुढे न ढकलता जबरदस्तीने घेण्याचा प्रयत्न केला तर परीक्षा केंद्र फोडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.  

अकलुज शहरातून मराठा समाजाकडून रैली काढण्यात आली. राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राज्य सरकारला जाग यावी यासाठी मराठा समाजाकडून टाळ आणि मृदुगाच्यासह्याने आंदोलन करत येत आहे.

Post a Comment

0 Comments